‘इन माय सिटी’ आणि ‘एक्झॉटिक’ या दोन गाण्यांना मिळालेल्या यशानंतर प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा संगीतक्षेत्रावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाली आहे. प्रियांकाच्या नुकत्याच आलेल्या ‘आय कान्ट मेक यु लव्ह मी’ या गाण्याने आयट्युन्स इंडियाच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. ‘आय कान्ट मेक यु लव्ह मी’ हे गाणे रिलीज झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत ह्या गाण्याने आयट्युन्स इंडियाच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. या गाण्याबद्दल प्रियांकाच्या अनेक चाहत्यांनी ट्विटरवरून प्रियांकाचे कौतुक केले. प्रियांकाचे ‘आय कान्ट मेक यु लव्ह मी’ हे गाणे १९९१मध्ये आलेल्या बोनी रॅटी यांच्या गाण्याची नवीन आवृत्ती आहे. बोनी रॅट यांचे हे गाणे रोलिंग स्टोन मासिकाने जाहीर केलेल्या सर्वकालीन महान ५०० गाण्यांच्या यादीत समाविष्ट आहे.