निर्माता साजिद नाडियदवालाने ‘किक’ चित्रपटाने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटातून त्याने पत्नी दिव्या भारतीला ‘सात समुंदर’ गाण्याद्वारे श्रद्धांजली अर्पित केली आहे. यासाठी त्याने राजीव पैच्या ‘विश्वात्मा’ चित्रपटातील दिव्या भारतीवर चित्रीत करण्यात आलेल्या सात समुंदर गाण्याचे अधिकार जवळपास दीड कोटी रुपयांना विकत घेतले. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी दिव्या भारतीचे निधन झाले. तिच्या मृत्यूनंतर त्याने निर्मिती केलेला प्रत्येक चित्रपट हा साजिदने दिव्याला समर्पित केला.
विशेष बाब म्हणजे या गाण्यावर सल्लूने ठेका धरला आहे. ‘किक ‘चित्रपटात सलमान ‘सात समुंदर’ गाण्यावर आपल्याच तालात नाचत, लिप्सिंग करताना दिसतो. रणदीप हुड्डाला हिणवण्यासाठी सलमान गाण्यावर नृत्य करतोय असे दृश्य चित्रीत करण्यात आले आहे. ‘किक’मध्ये रणदीप हुड्डा, जॅकलीन फर्नांडिस आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याही भूमिका असून या चित्रपटाने तीन दिवसात ८३ कोटींचा गल्ला जमविला आहे.

दिव्या भारतीचे विश्वात्मा चित्रपटातील मूळ गाणे