भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ सेलिब्रेटींना स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्याचे आवाहन २ ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी केले होते. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिनने तेंडुलकरला याचे नेतृत्व सोपविण्यात आले असून त्याने या कार्यास रविवारी पहाटे साडेचार वाजता सुरुवातही केली. आवाहन करण्यात आलेल्या नऊ सेलिब्रेटींमध्ये बॉलीवूड दबंग खान सलमानचाही समावेश आहे. सलमानने मोदींचे आवाहन स्वीकारले असून तसे त्याने ट्विटही केले. मी आणि माझे फाऊंडेशन बिइंग ह्युमन हे मोदींचे आवाहन स्वीकारत आहोत. मी स्वच्छ भारत अभियानासाठी पूर्णपणे सहकार्य करेन, असे त्याने ट्विट केले.



स्वच्छ भारत अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सोशल मिडियाचीही मदत मोदींनी घेतली आहे. #MyCleanIndia हा हॅशटॅग ट्विटवर सध्या सुरु आहे. तसेच, साफ करण्यात आलेल्या जागेचा व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रदर्शित करण्यास मोदींनी सांगितले आहे.