बॉलीवूडचा दबंग खान सलमान आज ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचे करोडो चाहत्यांनी शुभेच्छांचा त्याच्यावर वर्षाव केला आहे. ट्विटरवर तर #HappyBirthdaySalmanKhan हा टॅग पहिल्या क्रमांकावर आला आहे. सलमाननेही त्याच्या चाहत्यांसाठी वाढदिवसाच्या केकचे छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले आहे.