बॉलीवूड दबंग खानच्या ‘किक’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. दोन दिवसात या चित्रपटाने तब्बल ५० कोटींचा गल्ला जमावला आहे. चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, रणदीप हुड्डा, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याही भूमिका आहेत.

 

चित्रपट समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळालेल्या किकने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जवळपास २७ कोटींचा गल्ला जमावला होता. या कमाईने सलमानच्या आधीच्या सर्व चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे. मात्र, एक था टायगरचा (३२.९३ कोटी) रेकॉर्ड ‘किक’ मोडू शकला नाही.

 

सलमानचा याआधी प्रदर्शित झालेल्या ‘जय हो’ चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १७ कोटींचा गल्ला जमावलेला. मंगळवारी ईद असल्यामुळे त्या दिवशी सलमानच्या ‘किक’चा गल्ला आणखीन वाढू शकतो असे चित्रपट समीक्षक तरण आदर्शने ट्विट केले आहे.