सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या गाजलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील एक प्रसिद्ध दृश्य पुन्हा एकदा पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात समीर (सलमान खान) जाणुनबुजून नंदिनीच्या (ऐश्वर्या राय) केसांची वेणी पकडतो आणि नंतर तिची वेणी जोराने हवेत भिरकावून देतो, असे दृश्य आहे.
12हे दृश्य त्यावेळी प्रचंड गाजलेही होते आणि आता ते पुन्हा एकदा वेगळ्याच चित्रपटासाठी चित्रीत करण्यात येणार आहे. मात्र, यावेळी सलमानबरोबर ऐश्वर्याऐवजी सोनम कपूर असणार आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा ‘हम दिल दे चुके सनम’ प्रदर्शित झाला होता तेव्हा सलमान आणि ऐश्वर्या यांचे प्रेमकरण आणि दोघांचे बॉलीवूडमधील करिअर यशाच्या शिखरावर होते. दरम्यानच्या काळात, दोघांच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा आला असला तरी या चित्रपटात सलमान खानने साकारलेला समीर आणि ऐश्वर्या रायने साकारलेली नंदिनीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. चित्रपटातील गाणी, संवाद आणि अनेक दृश्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यापैकीच एक दृश्य पुन्हा एकदा सुरज बडजात्या यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटासाठी चित्रीत करण्यात येणार आहे. हे दृश्य चित्रीत झाले तेव्हाची काही छायाचित्रे प्रदर्शित झाली आहेत. ज्यामध्ये सलमान खानने शेरवानी तर सोनमने लेहंगा परिधान केला आहे. याआधी सलमान आणि ऐश्वर्यावर चित्रीत झालेल्या मुळ दृश्याइतकी रंगत या दृष्यात येणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

3