श्रीसाई ज्ञानपीठ ट्रस्टतर्फे मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या प्रभादेवी येथील मिनी थिएटरमध्ये संजीव चिम्मलगी यांचे गायन ऐकण्याची संधी एका विशेष कार्यक्रमात मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य आहे.
संजीव चिम्मलगी यांनी दादा भागवत यांनी चाल दिलेली १४५ पदे गायली असून त्याच्या सीडी प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यातील पंतमहाराज यांनी लिहिलेली निवडक पदे संजीव चिम्मलगी या कार्यक्रमात सादर करणार आहेत. संदीप कुलकर्णी, निरंजन लेले, राजेंद्र वैशंपायन, रक्षानंद पांचाळ आदी कलावंत त्यांना साथसंगत करतील. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिकांसाठी ९९८७४४९९२६ या क्रमांकावर संपर्क साधावा.