इंडियन प्रिमियर लीगच्या सातव्या पर्वाचा प्रारंभ नुकताच थाटात पार पडला. यावेळी समोरच्याला आपल्या कृत्यांनी बुचकळ्यात टाकणा-या शाहरुखने क्रिकेटपटू विराट कोहलीवर आपला निशाणा साधला.
कोलकता नाईट रायडर्स या संघाचा मालक शाहरुख खान याला स्टेजवर मस्ती करण्यात भारीच गंमत वाटते. या ओपनिंग सेरेमनीत शाहरुखने स्टेजवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा कर्णधार विराट कोहलीचे स्वयंवर आयोजित केले होते. त्‍याने विराटच्‍या गळयात अनुष्‍का शर्माच्‍या फोटोचा हार टाकला. अनुष्‍का शर्मा आणि विराट कोहली यांच्‍या प्रेमप्रकरणाची माध्‍यमांमध्‍ये चांगलीच चर्चा सुरु आहे. मात्र, या दोघांचेही आपण केवळ चांगले मित्र आहोत असे म्हणणे आहे.
आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात दीपिका पदुकोण, माधुरी दीक्षित, धोनी, विराट यांनी धम्‍माल मस्‍ती केली.