बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा मुलगा अबराम आणि शाहरुखची मैत्रीण व चित्रपटकर्ती फराह खानचा मुलगा जार हे मोठेपणी ग्रंथपाल होतील असे शाहरुखला वाटते. हातात पुस्तक घेतलेले अबरामचे एक छायाचित्र शाहरुखने टि्वटरवर पोस्ट केले असून, छायाचित्रासोबतच्या संदेशात तो म्हणतो, अभ्यास करतानाच्या या छायाचित्रातच सर्व पुरावे लपलेले आहेत.

शाहरुखच्या या पोस्टला प्रतिसाद देत फराहने तिच्या मुलाचे एक छायाचित्र पोस्ट केले आहे. छायाचित्रासोबतच्या संदेशात ती म्हणते, आणि हा माझा लाडला. मित्रासारखे सतत एक तरी पुस्तक त्याच्यासोबत असते. कागदाचा गंध आणि पान पलटण्याच्या भावनांना कोणीतीही गोष्ट मात देऊ शकत नाही. 

farah-sonत्यावर, शाहरुखने आपली मुले ग्रंथपाल बनतील, जी एक चांगली बाब आहे, परंतु आपण जेव्हा केव्हा बोलायला तोंड उघडू तेव्हा ते आपल्याला गप्प राहण्याचा इशारा करतील, अशी आशा व्यक्त करणारे पोस्ट केले आहे. उत्तरादाखल फराहने मनाजोगते काम अशी पोस्ट केली आहे.