‘कामसूत्र थ्रीडी’ या बॉलिवूडच्या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ‘ऑस्कर’ची तीन नामांकने मिळवली आहेत. ऑस्करसाठी सज्ज झालेल्या या चित्रपटामध्ये मिलिंद गुणाजी आणि मकरंद देशपांडे या दोन मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांनी महत्त्वाच्या व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राची ‘कामसूत्र थ्रीडी’ मध्ये मध्यवर्ती भूमिका आहे.
सुरूवातीपासून ‘कामसूत्र थ्रीडी’ हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे. आता थेट ‘ऑस्कर’नेच या चित्रपटाची दखल घेतल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ‘कामसूत्र थ्रीडी’ चित्रपटाला ‘ऑस्कर’च्या बेस्ट मोशन पिक्चर, ओरिजनल स्कोर आणि ओरिजनल साँग अशा तीन विभागांत नामांकन मिळाली आहेत.
रुपेश पॉल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला संगितकार सचिन आणि श्रीजीत यांनी संगीत दिले आहे. चित्रपटातील ‘हर हर महादेव’, ‘अय्यगिरी नंदिनी’, ‘सावरिया’, ‘आय फेल्ट’ आणि ‘ऑफ सोइल’, या पाचही गाण्यांना ‘बेस्ट ओरिजनल साँग’ विभागात नामांकनं मिळाली आहेत. ही गाणी रूपेश पॉल आणि प्रत्युष प्रकाश यांनी लिहिली असून, ओरिजनल स्कोर विभागात अन्य १०९ गाण्यांशी ‘कामसूत्र थ्रीडी’च्या गाण्यांची स्पर्धा होणार आहे.
ऑस्करसाठी प्राथमिक फेरीतील नामांकने जाहीर करण्यात आली असून त्यात एकूण २८९ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. येत्या १६ जानेवारी रोजी ऑस्करसाठी अंतिम नामांकनांची घोषणा करण्यात येणार असून २ मार्च रोजी ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
पाहा: ‘कामसूत्र थ्रीडी’चा ट्रेलर

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा