२०१३ सालातील चित्रपटांसाठी पुरस्कारांची घोषणा झाली असून  ‘शिप ऑफ थिसिअस’ या इंग्रजी-हिंदी चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचे स्वर्णकमळ जाहीर झाले, तर ‘भाग मिल्खा भाग’ हा सर्वोत्तम लोकप्रिय चित्रपट ठरला आहे.सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून ‘शाहीद’ चित्रपटासाठी हन्सल मेहता यांची निवड झाली आहे. याच चित्रपटातील भूमिकेसाठी राजकुमार राव याला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला आहे. ‘पेरारियाथवर’ (मल्याळम) मधील भूमिकेसाठी सूरज वेंजारामूडु यांनाही सर्वोत्तम अभिनेता म्हणून गौरविले जाणार आहे. सर्वोत्तम अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी गीतांजली थापा (लिअर्स डायस, हिंदी), सर्वोत्तम सहायक अभिनेता म्हणून सौरभ शुक्ला (जॉली एलएलबी, हिंदी), सर्वोत्तम सहायक अभिनेत्री म्हणून अमृता सुभाष (अस्तु, मराठी) आणि अइदा एल काशेफ (शिप ऑफ थिसिअस, हिंदी-इंग्रजी) यांना गौरविले जाणार आहे. ‘थालाइमुरुइगल’ या तामिळ चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या सर्वोत्तम चित्रपटासाठीच्या नर्गिस दत्त पुरस्काराने गौरविले जाणार आहे. ‘कफल’ (हिंदी) हा सर्वोत्तम बालचित्रपट ठरला आहे. ‘जॉली एलएलबी’ हा हिंदीतला सर्वोत्तम चित्रपट ठरला आहे. निषिता जैन दिग्दर्शित ‘गुलाबी गँग’ (हिंदी-बुंदेलखंडी) हा सामाजिक विषयावरील सर्वोत्तम लघुपट ठरला आहे.  प्रख्यात दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांच्या अध्यक्षतेखालील ११ सदस्यीय परीक्षक मंडळाने या पुरस्कारांची घोषणा केली. येत्या ३ मे रोजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होण्याची शक्यता आहे.

दुहेरी आनंद
शिफ ऑफ थिसिअस’च्या निवडीने दिग्दर्शक आनंद गांधी यांनी आनंद व्यक्त केला. हा पुरस्कार म्हणजे सरकारी संस्थांशी संवाद साधण्याचा दुवा ठरणार आहे, असे ते म्हणाले. त्यांनीच वितरित केलेल्या ‘गुलाबी गँग’ या लघुपटाचीही निवड झाल्याबद्दल त्यांनी दुहेरी आनंद झाल्याचे सांगितले.

संमिश्र भावना
‘शाहीद’चे दिग्दर्शक हन्सल मेहता यांनी या पुरस्काराचे श्रेय शाहीद आझमी यांना दिले. ते म्हणाले, पुरस्काराने माझ्या मनात संमिश्र भावना दाटून आल्या आहेत. शाहीद आझमी यांच्या कार्यानेच चित्रपटाला आणि आम्हाला आकार दिला. साडेतीन वर्षे हा चित्रपट तयार होत होता. त्या काळात माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या असलेल्या माझ्या सहकाऱ्यांचाही हा गौरव आहे.

हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. हा पुरस्कार मिळेल, असं वाटलंही नव्हतं. हन्सल मेहता, शाहीद चित्रपटाचा पूर्ण चमू आणि प्रेक्षकांचा मी आभारी आहे.
-राजकुमार राव

पुरस्कार                                                 पुरस्कार विजेते
* सवरेत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ)         शिप ऑफ थिसिअस (इंग्रजी-हिंदी)
’दिग्दर्शकाचा पदार्पणातील सवरेत्कृष्ट चित्रपट
 इंदिरा गांधी पुरस्कार                                   फँड्री (मराठी)
*सवरेत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट                        भाग मिल्खा भाग (हिंदी)
*राष्ट्रीय एकात्मता जपणारा सवरेत्कृष्ट चित्रपट
 नर्गिस दत्त पुरस्कार                                      थलाईमुराईगल (तामिळ)
*सामाजिक विषयावरील सवरेत्कृष्ट चित्रपट    तुह्या धर्म कोन्चा (मराठी)
*पर्यावरणविषयक सवरेत्कृष्ट चित्रपट             पेरारियाथावर (मल्याळम)
*सवरेत्कृष्ट बालचित्रपट                     कफल (हिंदी)
*सवरेत्कृष्ट दिग्दर्शक                         हंसल मेहता, शाहीद (हिंदी)
*सवरेत्कृष्ट अभिनेता                         राज कुमार, शाहीद (हिंदी)
*सवरेत्कृष्ट अभिनेत्री                         गीतांजली थापा, लिअर्स डायस (हिंदी)
*सवरेत्कृष्ट साहाय्यक अभिनेता        सौरभ शुक्ला, जॉली एलएलबी (हिंदी)
*सवरेत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री        अमृता सुभाष, अस्तू (मराठी) ऐद एल-काशेफ, शिप ऑफ थिसिअस  
*सवरेत्कृष्ट बालकलाकार            सोमनाथ अवघडे, फँड्री (मराठी) साधना, थांगा       मिंगल (तामीळ)
*सवरेत्कृष्ट पाश्र्वगायक              रूपांकर, जातिश्वर (बंगाली)
*सवरेत्कृष्ट पाश्र्वगायिका            बेला शेंडे, तुह्या धर्म कोन्चा (मराठी)
*सवरेत्कृष्ट संवाद                        सुमित्रा भावे, अस्तु (मराठी)
*परीक्षकांचा विशेष पुरस्कार         यलो (मराठी)मिस लव्हली (हिंदी)
*सवरेत्कृष्ट हिंदी चित्रपट               जॉली एलएलबी (दिग्दर्शक: सुभाष कपूर)
*सवरेत्कृष्ट मराठी चित्रपट            आजचा दिवस माझा
*विशेष दखल                               यलो