सोशल मीडियाच्या वाढत्या वापराने बॉलिवूडचे विश्वदेखील व्यापून टाकले. अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरूख खान, दीपिका पदूकोण, प्रियांका चोप्रासारख्या अनेक बड्या कलाकारांबरोबर इतर छोट्या कलाकारांचेदेखील सोशल मीडियावर अस्तित्त्व आहे. फेसबुक, टि्वटर आणि इंस्टाग्रामसारख्या समाजमाध्यमाद्वारे ते चाहात्यांच्या संपर्कात राहाण्याबरोबरच चित्रपटाचे प्रमोशनदेखील करतात. सोशल मीडियावर कोणाचे किती फॉलोअर्स आहेत यावरून त्यांची लोकप्रियतादेखील ठरते. सोशल मीडियावरील या गोतावळ्यात फेसबुक या सामाजमाध्यमावर अभिनेत्री सोहा अली खानने आपले प्रोफाईल तयार केले असून, टि्वटरवर तसा संदेश तिने प्रसिद्ध केला आहे. आपला प्रोफाईल फोटो अपडेट करण्याबरोबरच लग्नाच्या छायाचित्रांसह अन्य काही पोस्ट तिने फेसबुकवर प्रसिद्ध केल्या आहेत.