फॅ शनबद्दल प्रत्येकाची वेगळी मतं असतात. आपण कसं दिसावं, काय कपडे घालावेत, कुठले रंग वापरावेत यातून प्रत्येकाची ‘स्टाईल’ अधोरेखित होते. म्हणूनच, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना बोलावून त्यांच्या ‘फॅ शन’ बद्दलच्या संकल्पनांविषयी बोलतं केलं जातं. ‘मी सगळ्या जगाकडे कॅमेऱ्याच्या लेन्समधूनच पाहतो. कुठल्याही गोष्टीबद्दल, व्यक्तिबद्दल पूर्वग्रह न बाळगता खुल्या मनाने समोर घडणाऱ्या घटनांचा वेध घेणं ही माझी स्टाईल आहे. आपण जे पर्याय निवडतो त्यातून आपले व्यक्तिमत्व, आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि जगण्याची स्टाईल व्यक्त होत असते.