पोर्नपटांना अलविदा करून बॉलीवूडमध्ये आलेल्या अभिनेत्री सनी लिओनीने इंटरनेटच्या महाजालातील पोर्न संकेतस्थळांवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. पोर्नपटांची दुनिया सोडून बॉलीवूडमध्ये स्थिरस्थावर झालेल्या सनी लिओनीला सहसा आपल्या इतिहासाबाबत न बोलणेच पसंत करते. देशात पोर्न संकेतस्थळांवर बंदी घालण्यात आल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर देखील सनीने उघडपणे बोलणे टाळले आहे. मात्र, सनीने आपला पती डॅनिअल वेबरसोबतचा एक फोटो शेअर केला असून वेबरने परिधान केलेल्या टी-शर्टवरील संदेशातून तिने सेक्स हा विषय विकला जाऊ शकतो, असे अप्रत्यक्षरित्या मतप्रदर्शन केले आहे.