खंडेरायाच्या जीवनावरील आधारित जय मल्हार या मालिकेद्वारे घराघरात पोहचलेली म्हाळसा म्हणजेच सुरभी हांडे आता मोठ्या पडद्यावरही झळकणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं बाई अरेच्चा २’ चित्रपटाद्वारे सुरभी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय.
संधी मिळाली तरचं माणूस मोठा होऊ शकतो. आणि नवीन कलाकारांसोबत काम करणे ही जोखीम असली तरी त्यांच्यातील ऊर्जा नेहमीच प्रेरणा देत राहते. या केदार शिंदे यांच्या वक्तव्याला साजिशी ही निवड असून मोठ्या सोनाली कुलकर्णीच्या कॉलेज जीवनातील भूमिका सुरभीने साकारली आहे. पदवीचा अभ्यास करत असताना सुरभीची आंबट गोड मालिकेसाठी निवड झाली. त्याच दरम्यान २-३ वर्षांपूर्वी कोठारी ब्रदर्सची तिने ऑडिशन दिली होती. त्यानंतर जय मल्हार मालिकेतील म्हाळसाच्या भूमिकेसाठी तिला अचानक बोलावणे आले. हा प्रवास नव्यानेच सुरु असताना कोणतीही ऑडिशन न घेता केदार शिंदे यांच्यासारख्या दिग्दर्शकाने आपल्याला चित्रपटात घ्यावे याचे सुरभीला कौतुक आहे.
surabhi-hande-450
इरॉस इंटरनॅशनल प्रस्तुत व अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे निर्मित ‘अगं बाई अरेच्चा २’ चित्रपट २२ मे रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.