पी जी या सिनेमाद्वारे सुश्रुत भागवत दिग्दर्शन क्षेत्रात पर्दापण करीत आहेत.
‘दुनियादारी’, ‘अवंतिका’, ‘रेशीमगाठी’, ‘श्रावणसरी’, ‘कुलवधू’ यांसारख्या मालिकांमध्ये आपलं अभिनय कौशल्य सु्रत सुश्रुतने दाखवले आहे. सह्यायाद्री वाहिनीच्या ‘इथे नांदतो बाळू’ मालिकेतून प्रेक्षकांसमोर आलेल्या बाळूने अभिनयाचं कसब दाखवल्यानंतर आपला मोर्चा दिग्दर्शन क्षेत्रात वळवला. सुश्रुतने वयाच्या १० वर्षी अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. “स्वपनांच्या पालिकडले” या मालिकेपासून त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शनाला सरूवात केली. त्यानंतर त्यांने एकापाठोपाठ एक अशा तब्बल १४ मालिकांसाठी दिग्दर्शन केलं. बालाजी टेलिफिल्म्सची “माझिया प्रियाला प्रित कळेना”, “हे बंध रेशमाच़े”, “ओळखा”, “लक्ष्य”, “आंबट गोड”, “अस्मिता”,  “लेक लाडकी ह्या घरची”,   “पुढचं पाऊल”, “मांडला दोन घडीचा डाव़”, “लज्जा”, “अरूंधत़ी”, “सुहासिनी” अशा मालिकांचं तर ‘सखी’ तसेच ‘विभावंतर’ या नाटकांचं दिग्दर्शन करत आपल्या दिग्दर्शनाचा प्रवास त्याने कायम ठेवला. ह्या प्रवासातचं त्यांने पटकथा लेखक तसेच सहायक दिग्दर्शक म्हणून सौ. शशी देवधर या चित्रापटातन मोठया पडदयावर पदार्पण केले. त्यानंतर आता त्याचे पी जी आणि मुंबई टाईम्स असे दोन सिनेमे पेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. हृषिकेश मुखर्जी तसेच किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखले जाणारे यश चोप्रा यांच्यासारखे सिनेमे करायला आवडतील असे सु्रत भागवतचे म्हणणे आहे.