अभिनेत्री तनुश्री दत्ता रोमांचक मालिका ‘बेस्ट ऑफ फिअर फाइल्स’चे सूत्रसंचालन करणार आहे.
बेस्ट ऑफ फिअर फाइल्स ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना रोमांचित करणार आहे. या कार्यक्रमाद्वारे तनुश्री अद्भूत, अनाकलनीय आणि भितीदायक कथा सांगणार आहे. या मालिकेत इतर भीतीदायक आणि गुन्हेगारी मालिकांसारखी नसल्यामुळे यात काम करताना मजा आली. साक्ष आणि वास्तवाचे मिश्रण असणारी ही मालिका प्रेक्षकांना जाणूनबुजून धडकी न भरवता त्यांना गुंतवून ठेवेल आणि त्यांची करमणूकही करेल. लोक मला नव्या सूत्रसंचालिकेच्या रुपात स्वीकारतील अशी मला आशा आहे, असे तनुश्री म्हणाली. बेस्ट ऑफ फिअर फाइल्स ही मालिका शनिवार व रविवार झी वाहिनीवर दाखविण्यात येणार आहे.