सुप्रसिद्ध अभिनेता उमेश कामत ज्याने ‘बाळकडू’ या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले, आता दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील याच्या आगामी ‘जीआर’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
umesh-kamat
जेव्हा मी स्क्रिप्ट वाचले मी लगेचचं या प्रोजेक्टसाठी होकार दिला. याची महत्त्वाची कारण म्हणजे एकतर कथा आणि शिवाजी लोटन पाटील याचे दिग्दर्शन. तसेच मी या चित्रपटामध्ये अनुभवी आणि आदरणीय अशा कलाकारांबरोबर ज्यात वर्षा उसगांवकर आणि सयाजी शिंदे आहेत यांच्यासोबत काम करणार आहे. अशा टीमबरोबर काम करण्याचा अनुभव निश्चितच वेगळा असेल, असे उमेश म्हणाला.
‘धग’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे शिवाजी लोटन पाटील हे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर ‘जीआर’ या चित्रपटातून विनोदी आणि हलक्याफुलक्या पद्धतीने भाष्य करणार आहेत. ‘जीआर’चा अर्थ गव्हर्नमेंट रेझोल्यूशन (सरकारी ठराव). कोल्हापूरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.