दिग्दर्शक अनुराक कश्यपच्या बहुप्रतिक्षित ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटाच्या पहिलावहिल्या पोस्टरचे गुरूवारी अनावरण करण्यात आले. पोस्टरमध्ये बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर जॉनी बलराज नावाच्या भूमिकेत असून दोन्ही हातात ‘मशिन गन’ घेऊन धीरगंभीर नजर रोखून धरणाऱया रणबीरचे हे पोस्टर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने या चित्रपटाचे पहिले पोस्टर आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट केले आहे. चित्रपटातील मुख्य भूमिकेत दिसणारा रणबीर कपूर एक बॉक्सर आणि स्ट्रिट फायटरची व्यक्तिरेखा साकारत आहे
लेखक ग्यान प्रकाश यांच्या ‘मुंबई फेबल्स’ पुस्तकावर आधारीत हा चित्रपट मुंबईतील १९५०-६० च्या काळात घेऊन जाणारा असणार आहे. ‘फॅण्टम फिल्म्स’ आणि ‘फॉक्स स्टार इंण्डिया’यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटात अनुष्का शर्मा, करण जोहर, के के मेनन, मनिष चौधरी, सिद्धार्थ बासू आणि रेमो फर्नांडीस यांच्यादेखील भूमिका आहेत.