बॉलीवूड अभिनेता शशी कपूर यांना श्वास घेण्यास अडथळा येत असल्यामुळे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
७६ वर्षीय शशी कपूर यांना रविवारी संध्याकाळी श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यामुळे कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्‍टर राम नारायण यांनी दिली आहे.  ‘दीवार’, ‘सिलसिला’, ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटांसाठी ते खासकरून ओळखले जातात. त्यांच्यावर नुकतीच बायपास सर्जरीही करण्यात आली होती. गेल्या काही वर्षांपासून शशी कपूर यांची तब्येत खालावली आहे. १६० चित्रपटांमध्ये अभिनय करणा-या शशी कपूर यांना २०१० मध्ये फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. तसेच, त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.