भ्रष्टाचाराचा डाग लागल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आल्यानंतर आता सेन्सॉर बोर्डाने कणखर भूमिका घेण्याचे ठरविलेले दिसते. कारण, सेन्सॉर बोर्डाने दिग्दर्शक होमी अदजानियाच्या ‘फाइंडिंग फॅनी’ चित्रपटातील ‘व्हर्जिन’ या शब्दावर आक्षेप घेत तो काढून टाकण्यास सांगितले आहे.
चित्रपटातील एका सीननुसार, ‘मी व्हर्जिन आहे.’ या संवादावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप नोंदविला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी मात्र ‘दिल से’ आणि ‘२ स्टेट्स’ चित्रपटांतील संवादाचा आधार घेत यापूर्वी हा शब्द सर्रास वापरला गेला असल्याचे म्हणत बोर्डासमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण, सेन्सॉर बोर्डाने दिग्दर्शकाचे काहीच ऐकून घेतले नाही. उलट चित्रपटाला UA प्रमाणपत्र हवे असेल तर हा संवाद चित्रपटातून काढून टाकण्यात यावा असे बजावले आहे. त्यामुळे दिग्दर्शकावर संबंधित सीनच काढून टाकण्याची नामुष्की ओढावली असल्याचे बोलले जात आहे.
‘फाइंडिंग फॅनी’मध्ये वडिलांना पाहण्यास शाहिद उत्सुक
अर्जुन कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असणारा ‘फाईंडिंग फॅनी’ चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अर्जुन-दीपिका सोबत या चित्रपटात नासिर, डिम्पल, पंकज कपूर यांच्यासारखे कलाकार यामुळे ‘फाईंडिंग फॅनी’ने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
‘फाइंडिंग फॅनी’तील रणवीरच्या भूमिकेविषयी दीपिका अनभिज्ञ