फॅशन शो आणि ‘वॉर्डरोब मालफंक्शन’ (कपडय़ांची‘जाणता अजाणता’ आणि ‘नको तिथे’ घसरण) हे एक घट्ट समीकरण होऊन बसले आहे. या मालफंक्शनला प्रसिद्धीचा वास येतो. मात्र, ‘लॅक्मे फॅशन वीक’सारख्या नामांकित फॅशन शोमधून सहभागी होणाऱ्या मॉडेल्स आणि फॅशन डिझायनर्सचे म्हणणे वेगळे आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ब्रायडल फॅशन वीकमध्ये नर्गिस फाखरीच्या गाऊनवर मागे उभ्या असलेल्या मॉडेलचा पाय चुकून पडला व नर्गिसवर फजितीची वेळ आली. तिने हसून वेळ मारून नेली. मात्र, रॅम्पवर ऐनवेळी कपडे फाटणे, कपडे सैल होणे अशा गोष्टी घडू शकतात. कित्येकदा खूप काळजी घेऊनही शेवटच्या क्षणी असा गोंधळ उडतो असे फॅशन डिझायनर्सचे म्हणणे आहे. कोणत्याही फॅशन शोच्या वेळेस आपल्याला रॅम्पवरचे दिसणारे चित्र हे त्या शोचे अर्धेच चित्र असते. बॅकस्टेजला सर्कशीपेक्षाही मोठी अडथळ्यांची शर्यत मॉडेल्स, स्टायलिस्ट, साहाय्यक आणि डिझायनर मिळून पार पाडत असतात. नर्तकाप्रमाणे मॉडेललासुद्धा संगीताच्या ठेक्यावर आपला वॉक सुरू करावा असतो. अन्यथा मागच्या सर्व मॉडेल्सचा अंदाज चुकतो. त्यांना कपडे, ज्वेलरी, पादत्राणे बदलण्यासाठी अवघा मिनिटभराचा अवधी असतो. अशावेळी एखादी चूक होण्याची शक्यता असते. वास्तविक शोच्या दोन दिवस आधी मॉडेल्सना कपडय़ांचे फिटिंग तपासायची संधी मिळते. पण सेलेब्रिटीजना ही संधी मिळत नाही. शोच्या साधारण अर्धा तास आधी त्या तयार होतात. यात कधीतरी डिझायनरचा मापाचा अंदाज चुकण्याची किंवा सेलिब्रिटीलाही ड्रेस विशिष्ट प्रकारे कसा हाताळायचा याचा अंदाज न येण्याची शक्यता असते. त्यातून अशा चुका होतात.

सध्या सेलेब्रिटीज मिळेल त्या मार्गाने प्रसिद्धीसाठी धडपडत असले तरी, कोणत्याच मुलीला केवळ प्रसिद्धीसाठी या प्रकोरांमधून आपली अब्रू चव्हाटय़ावर येणे आवडणार नाही. यापेक्षा प्रसिद्धी मिळवण्याचे अनेक उत्तम आणि सोपे पर्याय या सेलेब्रिटीजकडे असतात.
अनिता कुमार, मॉडेल

फॅशन क्षेत्राला मालफंक्शनचा काहीच फोयदा होत नाही. डिझायनर इतको खर्च आणि मेहनत करून शो आयोजित करतो आणि या प्रकोराने सर्व लक्ष त्या सेलेब्रिटींक डे वळते. त्यामुळे आमच्यासाठी हा केवळ या क्षेत्रातील एक दुर्दैवी प्रकार आहे.
रेहा सुखेजा, मॉडेल

प्रत्येक शोच्या वेळेला बॅक स्टेजला असलेली घाई, घाईघाईने मॉडेल्सना कपडे बदलून रॅम्पवर आणणे हे सगळे इतक्या वेगाने घडत असतात की कधीकधी खूप कोळजी घेऊ नही शेवटच्या क्षणाला चूक घडू शकते. सेलिब्रिटी रॅम्पवर जाणार असतील तर ते याबाबतीत खूप सावध असतात. त्यांनाही त्यांच्या प्रतिमेची खूप चिंता असते. त्यामुळे रॅम्पवर जाऊन कपडे फोटणे या गोष्टी त्यांच्या प्रतिमेसाठी वाईटच असतात. म्हणून अशा प्रकोरचे नाजूक क पडे रॅम्पवर वावरायचे असेल तर आम्ही अनुभवी मॉडेल्सची निवड करतो.
वैशाली एस, फॅशन डिझायनर

सेलिब्रिटींच्या बाबतीत कोणत्याही प्रकोरची प्रसिद्धी ही प्रसिद्धीच असते, असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. फॅशन शोमध्ये डिझायनर्सना आपल्या क लाकृ तीला प्रसिद्धी मिळणे हे जास्त आवश्यक वाटते. त्यामुळे ‘मालफंक्शन’ हे चुकू नच घडते. मालफं क्शनचे महत्त्वाचे कारण म्हणजे बॅक स्टेजला मॉडेल्सना कपडे बदलण्यासाठी मिळणारा कमी वेळ, मदतीला असणाऱ्या मुली अनेकदा अनुभवी नसतात. त्यामुळे एकाचवेळी १६-१८ मॉडेल्सना सांभाळून घेणे अवघड जबाबदारी असते.
श्रुती संचेती, फॅशन डिझा

मालफंक्शनचे प्रकोर दुर्दैवी असतात, पण जाणूनबुजून केलेले नसतात. शोच्या आधी कपडय़ांच्या फिटिंगची संधी सेलेब्रिटीजना मिळत नाही. त्यात शोच्यावेळेस खोलीतून रॅम्पवर जाताना भलामोठा गाऊन, दागिने, हिल्सचे शूज सांभाळत धावावे लागते. मग कधीतरी एखादे हुकलावायची राहतो, पदर चुकीच्या दिशेने घेतला जातो, बटन तुटते आणि मग‘मालफंक्शन’ होते. हे साऱ्यांनाच टाळणे शक्य नसते.
निधी सुनील, मॉडेल