स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाच्या प्रसाराबरोबर इंटरनेटवर प्रत्येकजण इतरांपेक्षा हटके पोस्ट टाकण्यासाठी उत्सुक असल्याचे अनेक वेळा पाहायला मिळते. यासाठी नवनवीन कल्पनांचा वापर केला जातो आणि तो एक ट्रेण्ड बनतो. या सर्वातून बॉलिवूडदेखील सुटलेले नाही. सध्या बॉलिवूडमध्ये ‘डबस्मॅश’ व्हिडिओचे वारे वाहात असून बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाबरोबरचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. सोनाक्षी सिन्हा, अलिया भट, जॅकलिन फर्नांडिस आणि रणवीर सिंग यांनी यापूर्वी ‘डबस्मॅश’ प्रकारातील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ‘शॉटगन’ म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेले प्रख्यात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या १९७१च्या ‘मेरे अपने’ चित्रपटातील प्रसिद्ध संवादाची नक्कल केलेला व्हिडिओ सलमानने फेसबूकवर पोस्ट केला आहे. तर सोनाक्षी सिन्हाने माला सिन्हाच्या संवादाची नक्कल केली आहे.