यो यो हनी सिंगची गाणी सध्या सर्वत्र चालत आहेत. बच्चे कंपनी तर जणू त्याच्या गाण्यांसाठी वेडी आहे. मात्र, आता त्याच्यासोबत रॅप करणा-या रॅपर बादशाह याने पहिल्यांदाच स्वतंत्र गाणे गायलेयं. सोनम कपूरच्या आगामी ‘खुबसूरत’ चित्रपटातील ‘अभी तो पार्टी शुरु हुइ है’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.
‘अभी तो पार्टी शुरु हुइ है’ हे चित्रपटाचे प्रमोशनल गाणे आहे. एका रॉयल पार्टीत सोनम कपूर मद्य पिऊन आपल्या खट्याळ अंदाजात नृत्य करण्यात यात पाहायला मिळते. शशांक घोष दिग्दर्शित ‘खुबसूरत’मध्ये प्रोसेनजीत चॅटर्जी, किरण खेर, फवाद अफझल खान, रत्ना पाठक यांच्याही भूमिका आहेत.