बहुप्रतीक्षीत ‘बिग बॉस’च्या आठव्या पर्वाला रविवारी मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. ‘बिग बॉस’ आणि सलमान खानचे अनेक चाहते छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस’च्या उद्घाटनाचा पहिला भाग पाहत दूरचित्रवाणी संचासमोर खिळून राहिले. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांमध्ये होणारे संघर्ष, त्यांच्यात निर्माण होणारे जव्हाळ्याचे, त्यांना दिले जाणारे टास्क आणि घरातील वातावरण… अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना हा शो पाहण्यासाठी प्रवृत्त करतात आणि ‘बिग बॉस’च्या घरात घडणाऱ्या गोष्टींवर चर्चां रंगतात. भूतलावर चर्चिला जाणारा हा शो, जर परग्रह वासियांना त्यांच्या ग्रहावर पाहाण्याची संधी मिळाली, तर पृथ्वीवरील जीवनाविषयी त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील? कदाचित त्यांच्या प्रतिक्रिया खालील स्वरूपाच्या असतील: