अनेकवेळा सेलिब्रिटी विचित्र विधाने करून अथवा चुकीची उत्तरे देऊन त्यांच्या अकलेचे तारे तोडताना दिसतात. जसे मल्लिकाचे ‘माझे जीवन हे ओबामांच्या जीवनासारखे आहे…’ असे म्हणणे किंवा ‘भारताचे राष्ट्रपती कोण?’ या प्रश्नाला आलिया भटने ‘पृथ्वीराज चव्हाण’ असे धक्कादायक उत्तर देणे, अशी काही वानगीदाखल उदाहरणे देता येतील. येथे देण्यात आलेली सेलिब्रिटींची धक्कादायक विधाने पाहून जणूकाही यांच्यात सर्वात बुद्धू (मुर्ख) सेलिब्रिटी कोण, याची स्पर्धाच लागली असल्याचे जाणवते. आमच्या मते यात अमिषाने बाजी मारली आहे… तुमच काय मत आहे?