सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा बहुप्रतिक्षित अॅक्शन- कॉमेडी सिनेमा ‘अ जंटलमन’चे दुसरे गाणे ‘बात बन जाये’ प्रदर्शित झाले. २५ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून या सिनेमातून पहिल्यांदा सिद्धार्थ दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थची पहिली भूमिका सुशील गौरवची आहे तर दुसरी भूमिका रिस्की ऋषीची आहे. जॅकलिनला सुंदर सुशील मुलगा न आवडता नेहमी फ्लर्ट करणारा मस्तीखोर मुलगा आवडत असतो. जॅकी आणि सिड पहिल्यांदा या सिनेमातून एकत्र काम करत आहे. ‘बात बन जाये’ गाण्यात मियामी येथील नयनरम्य स्थळं दाखवण्यात आली आहेत.

महिन्यात फक्त १५ दिवस काम करतात शिवाजी साटम, पण त्यांचे मानधन वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

या गाण्यात साध्या, सरळ गौरवची एक झलक पाहायला मिळते. तर जॅकलिन एका शांत गौरवला कशी मस्ती करायला शिकवते हे दाखवण्यात आले आहे. या गाण्यात जॅकलीन फार हॉट दिसते जी स्केटिंग करता करता मियामीच्या बीचवर फार मस्ती करत आहे. या गाण्यातले जॅकलिनचे हावभाव तिच्या प्रेमात पडायला भाग पाडणारे असेच आहेत. या गाण्याला सचिन जिगरने संगीत दिले असून सिद्धार्थ बसरुर आणि प्रिया सरैया यांनी हे गाणे गायले आहे.

राज निदिमोरु आणि कृष्णा डीके यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या गाण्याला आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत जॅकलिनने लिहिले की, ‘गौरव+ काव्या+ बीचवरची मजामस्ती = बात बन जाए गाणे प्रदर्शित झाले.’ या दोघांना याआधी करण जोहरच्या कॉफी विथ करण कार्यक्रमात एकत्र पाहिले होते. अ जेंटलमनसोबतच्या जॅकलिनचा वरुण धवन आणि तापसी पन्नूसोबत ‘जुडवा २’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी जॅकलिनने एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत ती डोक्यावर शरीराचा भार देऊन व्यायाम करताना दिसते. जॅकलिनच्याआधी आलिया भट्ट आणि सोनाक्षी सिन्हानेही डोक्यावर शरिराचा भार घेताना व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.