गेल्या दोन आठवड्यांपासून मराठी चित्रपटसृष्टीत जोरदार चर्चा सुरू असलेल्या ‘सैराट’ चित्रपटाने बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान यालाही ‘याडं लावलं’ आहे. आमीर खान सैराट चित्रपट पाहून नि:शब्द झाला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर आमीरने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.

मी नुकताच सैराट चित्रपट पाहिला. माझं हृदय हेलावून गेलं आहे. चित्रपटाच्या शेवटाच्या धक्क्यातून मी अजून सावरलेलो नाही, असे ट्विट आमीर खानने केले आहे. याशिवाय दिग्दर्शक नागराज मंजुळेसह संपूर्ण स्टारकास्टचे आमीरने तोंडभरून कौतुक केले आहे. आमीरने सैराटबाबतीत एकूण तीन ट्विट्स केले. त्यातील दुसऱया ट्विटमध्ये आमीरने दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अतुल, अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता आकाश ठोसर यांच्यासह सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत असलेले तानाजी गालगुंडे आणि अरबाज शेख यांचे अभिनंदन केले, तर तिसऱया ट्विटमध्ये आमीरने ‘सैराट’ न पाहिलेल्या प्रेक्षकांना हा चित्रपट आवर्जुन पाहण्याचे आवाहन देखील केले आहे.

आमीर खानने केेलेले ट्विट्स-