बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ सिनेमाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. पण आमिरने त्याच्या व्यग्र कारभारातूनही वेळ काढत कुटुंबासाठी वेळ राखून ठेवला. सध्या तो पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद राव खानसोबत इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद उपभोगत आहे. इटलीतील त्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. यात हे तिघं आपल्याच दुनियेत मशगुल असल्याचे दिसते.

ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकला ‘बाहुबली २’ सिनेमातील ‘हा’ अभिनेता

या फोटोमध्ये आमिर कमालीचा हॅण्डसम दिसतोय. एका सिनेमाचे चित्रीकरण झाले की दुसरा सिनेमा हातात घ्यायचा असेच अनेक कलाकार करतात. पण त्यामुळे कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही. म्हणून खास आझादसाठी आमिरने वेळात वेळ काढून त्याने सुट्टीला जाण्याचा निर्णय घेतला. नुकतेच आमिरने त्याच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या सिनेमाचे चित्रीकरण संपवले. आता सिनेमाचे चित्रीकरण संपल्यावर प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचावा म्हणून त्याचे प्रमोशनही सुरू होईल.

या सगळ्या कामाच्या व्यापात तो आझादला हवा तसा वेळ देऊ शकत नाही. यामध्ये ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’चे चित्रीकरणही आहेच… म्हणूनच काही झाले तरी यावेळी थोडासा ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांनाही आवडलेला दिसतो. कारण आमिरचे वेगळ्या लूकमधील फोटो पाहून त्याचे चाहते जास्तच खूश झालेत. सध्या हे कुटुंब रोममध्ये असून तिकडचा इतिहास जाणून घेत आहेत.

जाणून घ्या, कोणत्या देशात किती आहेत बच्चन कुटुंबियांचे बंगले

या फोटोंमध्ये आमिर त्याच्या ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ सिनेमातील लूकमध्ये दिसतोय. पिळदार मिशा आणि नाकात रिंग, असा त्याचा हटके लूक या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. या सिनेमात आमिर व अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. तुर्तास या सिनेमातील आमिर आणि फातिमाचा लूक कळण्यात आला आहे. पण अमिताभ आणि कतरिनाचा यातील लूक अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.