बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट सध्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. लवकरच बॉलिवूडमध्ये आमिर ३० वर्षे पूर्ण करणार आहे. चाहत्यांची मनं जिंकण्यामागचं आणि सुपरस्टार होण्यामागचं श्रेय आमिर त्याच्या चित्रपटांना देतो. चित्रपटांपेक्षा कलाकार कधीच मोठा नसतो, असं तो म्हणतो. अशा या आमिरचा जीवनप्रवास पुस्तकरुपात वाचायला कोणालाही आवडेल. त्यालाही आपलं आयुष्य पुस्तकरुपात मांडायला आवडेल. पण यासाठी त्याने एक अट ठेवल्याचं वृत्त ‘दैनिक जागरण’ या वेबसाइटने दिली आहे.

‘मी माझ्या आयुष्यावर पुस्तक लिहून ते सिलबंद करून ठेवीन. माझ्या मृत्यूनंतरच या आत्मचरित्राचं प्रकाशन व्हावं, असं मी माझ्या वकीलाला सांगून ठेवेन. माझ्या हयातीत त्या आत्मचरित्राचं प्रकाशन व्हावं, अशी माझी इच्छा नाही. सध्या तरी ते आत्मचरित्र लिहिण्यात काही शहाणपण नाही. कारण लोकांना माझ्याबद्दल सगळं काही ठाऊक आहे. पुढच्या ५० किंवा १०० वर्षांनंतर माझ्या जीवनावर बायोपिकची निर्मिती केली जाऊ शकते,’ असं तो म्हणाला.

PHOTOS : कॅमेऱ्यांपासून बचाव करण्यासाठी अक्षयच्या मुलाची नामी शक्कल

कोणत्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपटात भूमिका साकारायला आवडेल असा प्रश्न आमिरला विचारलं असता तो पुढे म्हणाला की, ‘राज कपूर यांच्या बायोपिकमध्ये काम करायला मला आवडेल. कारण त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास प्रेरणादायी आहे.’

वाचा : गैरवर्तनामुळे त्याला कॉलेजमधून निलंबित केलं होतं; आदित्यच्या कॉलेजमधील विद्यार्थिनीचं ट्विट

प्रसिद्धी मिळण्यामागे कोणताही तर्क नसतो, असं आमिर मानतो. ‘माझ्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत मला प्रसिद्धी कशी मिळाली याचं उत्तर मला देता येणार नाही. ज्या व्यवसायात जोखीम कमी आहे, अशात मी जावं, अशी माझ्या आईची इच्छा होती. पण मी सर्वांत असुरक्षित मानल्या जाणाऱ्या इंडस्ट्रीत आलो आणि इथे टिकलो.’