ट्विटरने अधिकृत ट्विटर अकाऊंट बंद केल्यानंतर गायक अभिजीत भट्टाचार्यने सोमवारी @singerabhijeet हे नवीन अकाऊंट सुरु केले होते. पण, ट्विटरने त्याच दिवशी अभिजीतला दणका देत त्याचे नवे अकाऊंटही बंद केले. मात्र यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वाचा : प्रभासशी लग्नाबद्दल अनुष्का म्हणते की…..

अभिजीत भट्टाचार्यने ट्विटरवर पुनरागमन केल्यावर त्याच्या चाहत्यांनी ट्विट करून त्याचे स्वागत केले होते. त्यांचे ट्विट रिट्विट केल्यानंतर अभिजीतने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करत पहिले ट्विट केले. या व्हिडिओला त्याने ‘वंदे मातरम्’ म्हणत सुरुवात केली होती. महिलांविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याने अभिजीतचे अकाऊंट बंद करण्यासाठी युजर्सने ट्विटरकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्याचे पहिले ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते.

वाचा : ‘द कपिल शर्मा शो’साठी सलमान बनला तारणहार

नव्या अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत अभिजीत म्हणालेला की, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाच्या आणि भारतीय सेनेच्या विरोधात नारेबाजी करणाऱ्या आवाजाच्या मी विरोधात आहे. आजच मी हे नवे अकाऊंट सुरु केलेय. जोपर्यंत माझे अधिकृत अकाऊंट सुरु होत नाही तोपर्यंत तुम्ही मला इथे फॉलो करू शकता. माझ्या नावाने चालणारे इतर सर्व ट्विटर अकाऊंट्स खोटे आहेत. बोला, जय हिंद. भारत माता की जय. वंदे मातरम्. मी परत आलोय. देशाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आपण एकत्र सर्वनाश करू.  भारत माता की जय. वंदे मातरम्’