बॉलिवूडचे स्टार कपल अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी नुकतेच न्युयॉर्कमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. दोघंही गेल्या एका महिन्यापासून अमेरिकेतच होते. त्यांच्यासोबत ऐश्वर्याची आई वृंदा राय आणि मुलगी आराध्याही होत्या. अॅश- अभीने मैनहैटनमध्ये आपलं स्वप्नातलं अपार्टमेंट खरेदी केले आहे. अभिषेक गेल्या आठवड्यात भारतात परत आला होता. तर शुक्रवारी मध्यरात्री ऐश्वर्या, आराध्या आणि वृंदा राय हे भारतात परतले. त्यांचे भारतात परततानाचे अनेक फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कोणी आपले फोटो काढत असेल तर काय करावे, शाहरुखची सुहानाला हटके टिप्स

मुंबईसह इतर अनेक देशांमध्ये बच्चन कुटुंबियांची घर आहेत. दुबईमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याने रिसॉर्ट स्टाइल स्विमिंग पूल आणि बाग असणारा एक व्हिला खरेदी केला आहे. तर दुसरीकडे अमिताभ आणि जया यांचा फ्रान्समध्ये एक बंगला आहे. अमिताभ यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला जया यांना पॅरिसमधील हा बंगला भेट म्हणून दिला होता.

‘पिंकविला’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ऐश्वर्या आणि अभिषेकने हा बंगला वर्षभरापूर्वी विकत घेतला होता. पण याबद्दल कोणालाही कळू नये असेच त्यांना वाटत होते. कुटुंबातील जवळील मित्र- परिवाराशिवाय याबद्दल फारसे कोणाला माहित नव्हते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईच्या घराप्रमाणेच न्यूयॉर्कमधील हे घरही ऐश्वर्याचीच पसंती आहे. गेला महिनाभर ऐश्वर्या आणि अभिषेकने त्यांच्या या स्वप्नातल्या घरात काही निवांतक्षण घालवले. पण प्रो- कबड्डीच्या आगामी सिझनमुळे अभिषेकला भारतात परत यावे लागले.

जया बच्चन ठरल्या सर्वोत्कृष्ट संसदपटू; बिग बींनी केले कौतुक

दरम्यान, रुपेरी पडद्यापासून जवळपास सात महिने दूर राहिल्यानंतर बॉलिवूडची सौंदर्यवर्ती ऐश्वर्या राय बच्चन लवकरच नव्या सिनेमात दिसणार आहे. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी ‘फॅनी खान’ या सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसेल. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने महत्त्वपूर्ण भूमिका करण्याकडे प्राधान्य दिले होते. तिने ‘जझ्बा’, ‘सरबजीत’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’सारख्या सिनेमांमध्ये तिच्या अभिनयाची चुणूक पुन्हा दाखवून दिली. ‘जझ्बा’ आणि ‘सरबजीत’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कमाई करण्यात अयशस्वी ठरले तरी यातील ऐश्वर्याच्या कामाची आणि तिने स्वीकारलेल्या भूमिकांची सर्व स्तरातून प्रशंसा करण्यात आली होती.