‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेला आघाडीचा अभिनेता अमेय वाघ लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. स्वतः अमेयनेच आपल्या भावी जोडीदारासोबतच फोटो फेसबूक पेजवर प्रसिद्ध केला आणि त्याच्या हजारो चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. साजिरी देशपांडे असे त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे.

गेली १३ वर्षे ती मला सहन करते आहे आणि यानंतरही ती माझ्यासोबत सुखाने राहू शकेल, असे तिला वाटते. तुम्ही सर्वांनी तिला आशीर्वाद द्यावेत आणि मलाही शुभेच्छा द्याव्यात, असे अमेयने या पोस्टमध्ये लिहिले आहे. अमेयने साजिरीसोबतचा एक फोटो शेअर करून आपल्या नव्या इनिंगची सुरुवात होण्यास आता केवळ १२ दिवस राहिले असल्याचे सांगितले आहे. या बातमीने अमेयच्या चाहत्या तरुणींचा हिरमोड झाला असेल पण त्याच्यावर शुभेच्छांचाही तितकाच वर्षाव सुरू आहे.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
Criminal action in case of beating of MSEDCL employees
महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यास महागात पडणार

आज अचानक अमेयने ही पोस्ट प्रसिद्ध केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आपल्या अभिनयामुळे अमेयने अगदी अल्पावधीत युवापिढीच्या मनात स्थान मिळवले. नुकताच त्याची प्रमुख भूमिका असलेला ‘मुरांबा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. याच चित्रपटातील अमेयची सहकलाकार मिथिला पालकरसोबत याआधी त्याचं नाव जोडलं गेलं होतं. दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याची अनेकदा चर्चा झाली. मात्र आता अमेयच्या या फेसबुक पोस्टनंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मराठी रंगभूमीवर त्याची भूमिका असलेले ‘अमर फोटो स्टुडिओ’ नाटकही गाजत आहे.