ज्येष्ठ रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंडतर्फे दिला जाणारा सु. ल. गद्रे पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रविवार, १ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुलुंड येथील संस्थेच्या सभागृहात होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज यांच्या हस्ते हा  पुरस्कार डॉ. मोहन आगाशे यांना दिला जाणार आहे.
‘घाशीराम कोतवाल’ या नाटकापासून सुरू झालेला डॉ. मोहन आगाशे यांचा रंगभूमीवरचा प्रवास, अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमधील विविध भूमिका तसेच टीव्हीवरील मराठी-हिंदी मालिकांमध्ये काम करून रसिकप्रिय अभिनेते म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे. २५ हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कार सोहळ्यानंतर ‘व्हय मी सावित्रीबाई’ हा एकपात्री प्रयोग सुषमा देशपांडे सादर करणार आहेत. कार्यक्रम तसेच प्रयोग पाहण्यासाठी सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान