कंगना मला मारहाण करायची, माझ्यावर काळी जादू करायची, असा धक्कादायक खुलासा कंगनाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर अध्ययन सुमन याने नुकताच केला. त्यामुळे अभिनेता ह्रतिक रोशनविरुद्धच्या वादामुळे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या कंगना रणौतच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कंगना मला मारहाण आणि काळी जादू करायची, माजी प्रियकराचा धक्कादायक खुलासा

अध्ययनने डीएनएला दिलेल्या मुलाखतीत, मीदेखील ह्रतिकसारख्या परिस्थितीतून गेलोय. कंगना मला मारहाण करायची, माझ्यावर काळी जादू करायची असे म्हटले होते. त्यानंतर आता आपण असे वक्तव्य का केले याबाबतचा खुलासा अध्ययनने ट्विटरद्वारे केला आहे. यात त्याने म्हटले की, मी जे काही बोललो ते माझ्या हृदयापासून बोललो. जेणेकरून सत्य बाहेर येईल. मी बराच काळ या गोष्टी सहन केल्या होत्या. मी हे सर्व काही ट्विटर ट्रेण्डमध्ये किंवा प्रसिद्धीत येण्यासाठी केलेले नाही, असेही त्याने ट्विटमध्ये म्हटलेय.