बॉलिवूडची बबली गर्ल श्रद्धा कपूर ही तिच्या बिनधास्त पण दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. आव्हानात्मक भूमिका करायला तिला प्रचंड आवडते. तिने रोमँटिक, अ‍ॅक्शनपट, थ्रिलर सर्व प्रकारचे सिनेमे आत्तापर्यंत केले आहेत. ‘आशिकी २’ ‘रॉक ऑन २’ या सिनेमाच्या माध्यमातून तिने गाणे देखील गायले. बी-टाऊनच्या कलाकारांमध्ये जी एक व्हर्सेटॅलिटी हवी असते ती तिच्यात आधीपासूनच होती. काळानूरुप तिने मेहनतीने तिच्या अभिनयात बदलही केले.

लाल रंगाचा सलवार-कमीस घातलेल्या श्रद्धा कपूरने तिच्या आगामी चित्रपट ‘ओके जानू’ चा शेवटचा सीन शूट केला आणि रात्रीच सिनेमाची संपूर्ण टीमने सहकलाकार आदित्य रॉय कपूरसोबत जंगी पार्टी सेलिब्रेशन केले. शेवटचा सीन हा पूर्णपणे गाण्याचे चित्रिकरण होते. हे गाणे नृत्यदिग्दर्शिका वैभवी मर्चंट हिने बसवलेले आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे उपस्थित गर्दीसह हा सीन शूट झाला. सेटवरच मग छान सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी आदित्य, श्रद्धा आणि शाद यांनी केक कापून सहकारी, निर्माता यांच्यासह सेलिब्रेशन केले.

Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
ravichandran ashwin profile
व्यक्तिवेध : रविचंद्रन अश्विन
Pooja bhatt birthday special hero Bollywood film industry journey
Pooja Bhatt: वडिलांशी लिपलॉक ते न्यूड फोटोशूट! अशी आहे बॉलिवूडच्या ‘बॉम्बे बेगम’ची गोष्ट
Stupa Architecture
UPSC-MPSC: भारतीय स्थापत्य रचनेतील स्तूपाची परंपरा नेमकी काय आहे?

ok-jaanu-5

‘ओके जानू’ सिनेमाचे विशेष म्हणजे, सिनेमाच्या शूटिंगपासून सेटवरील फोटो आऊट करण्यात आले नाहीत. त्यामुळे सिनेमाबद्दल विशेष उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. आता तर सिनेमाचे चित्रिकरणही संपले आहे. त्यामुळे पोस्ट प्रोडक्शननंतरच सिनेमाचा टीझर आऊट होईल, असे सुत्रांकडून कळतेय.

https://www.instagram.com/p/BNPFa9sArlc/

दरम्यान, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेली दाऊदची बहिण हसीना पारकर हिच्यावर सिनेमा काढण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील दाऊदची बेनामी मालमत्ता सांभाळणाऱ्या हसीना हिचा ‘दाऊदची बहीण’ म्हणून दबदबा होता़. नागपाडा येथील आलिशान ‘गॉर्डन हाऊस’मध्ये वास्तव्याला असलेल्या हसीनाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ती दाऊदच्या सर्वात जवळ होती. तसेच, तिची जीवनकथाही रंजक असल्याने दिग्दर्शक अपूर्व लाखिया तिच्या जीवनावर ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ हा चित्रपट काढत आहे. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर ही हसीना पारकरची भूमिका साकारत आहे. दरम्यान, दाऊदच्या परिवाराने अचानक जाऊन श्रद्धाची भेट घेतली. हसीनाची तिन्ही मुले चित्रपटातील कलाकारांना भेटण्यासाठी गेली होती.