५०० आणि १००० रुपयांच्या नोटा मोदी सरकारने अचानकपणे बंद केल्यामुळे व्यावसायिकांना मात्र याचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. याचा फटका मराठी नाट्य सृष्टीलाही पडला आहे. प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्रोडक्शनचे ‘गेला उडत’ आणि सुनिल बर्वे यांच्या सुबकची निर्मिती असलेले ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकांचे प्रयोग काही काळासाठी रद्द केले होते.

मात्र आता या सर्व गोष्टीवर पर्याय म्हणून ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाच्या टीमने धनादेश, ऑनलाइन बुकिंग, डेबिट कार्ड, बुक माय शो अशा अनेक मार्गांनी तिकीट विक्री करण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या या नव्या प्रयत्नाला भरघोस प्रतिसादही मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण नुकतेच अमेय वाघने सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये अभिनेता सुनिल बर्वे, सखी गोखले आणि अमेय वाघ या कलाकारांनी हातात खूप सारे धनादेश घेतल्याचा पाहायला मिळत आहे. त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी अनेक लाइक्स दिले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या या पयार्याचे अनेकांनी मनापासून कौतुकदेखील केले आहे.

eknath shinde devendra fadnavis
सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय? शिंदे गटाचा संतप्त सवाल; नेमकं प्रकरण काय?
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाची निर्मिती अभिनेते सुनिल बर्वे यांनी केले आहे. तर या नाटकात अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे यांची महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळत आहे. या नाटकाचे प्रयोग आपल्याही गावात व्हावे अशी इच्छादेखील त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली असल्याचे दिसत आहे. झी मराठीच्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून या टीमने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तसेच या मालिकेनंतर आता ही टीम पुन्हा रंगभूमीवर पाहायला मिळत असल्यामुळे चाहतेदेखील आनंदात असल्याचे दिसत आहे.