बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या खोट्या बातम्या सध्या पाकिस्तानमधून पसरविण्यात येत आहेत. आऊटलूक पाकिस्तानसह इतर काही संकेतस्थळांनी यासंदर्भातील दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या संकेतस्थळाने लिहिले आहे की, मिस वर्ल्ड आणि भारतीय सिनेसृष्टीची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सासरीच तिने हे कृत्य करण्याचा प्रयत्न केला.

 

aish-death1480900958_big

या बातमीला लिहिण्यात आले आहे की, ऐश्वर्याने स्वतःचे आयुष्य संपवून टाकण्यासाठी ट्रँक्विलायझर हे औषध अधिक प्रमाणात घेतले. बच्चन कुटुंबियांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांनी डॉक्टरांना घरीच बोलावले आणि तिच्यावर उपचार सुरु केले. बच्चन कुटुंबीय या घटनेला लपवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळेच त्यांनी ऐश्वर्याला रुग्णालयात घेऊन न जाता घरीच तिच्यावर उपचार केले. ज्या डॉक्टरांनी ऐश्वर्यावर उपचार केले, त्यांनाही ही घटना बाहेर कुठे सांगण्याची मनाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अभिषेक म्हणाला होता की, त्याला एका अशा सिनेमात काम करायचे आहे ज्यात संपूर्ण बच्चन कुटुंबिय असेल.

aish-death21480901120_big

ज्या डॉक्टरने ऐश्वर्याचे उपचार केले त्याने हे सर्व त्याचे नाव पुढे येणार नाही, या अटीवर हे सर्व सांगितले असेही त्या संकेतस्थळावर लिहिले आहे. ‘मला मरु द्या. मला असे निराशाजनक आयुष्य जगायचे नाही, यापेक्षा मेलेले बरे’, असे म्हटले असे या संकेतस्थळाने लिहिले आहे. एवढेच नाही तर त्यांनी पुढे असे लिहिले की, ऐश्वर्या तिच्या वैवाहिक जीवनाला कंटाळली होती. त्यात ऐ दिल है मुश्किल या सिनेमात रणबीरसोबत चित्रित केलेली बोल्ड दृश्ये बच्चन कुटुंबियांना फारशी पटली नाहीत. त्यामुळे तिच्या वैवाहिक जीवनात तणावग्रस्त होते. असे असले तरी बच्चन कुटुंबियांनी या सर्व गोष्टी कधी मान्य केल्या नाहीत.

reveile1480901024_big

thereveillenwu.com या संकेतस्थळानेही ऐश्वर्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी बातमी प्रसिद्ध केली. यावेळी त्यांनी तिचा फोटोही प्रसिद्ध केला, ज्यात ती एका स्ट्रेचरवर झोपलेली दिसत आहे. काही बातम्यांमध्ये लिहिले आहे की, स्ट्रेचरवर झोपलेल्या ऐश्वर्याचा हा फोटो १२ वर्षांपूर्वीचा आहे. खाकी सिनेमाचे चित्रिकरण करत असताना तिला एक अपघात झाला होता. तेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पण, या सर्व बातम्या खोट्या असून ऐश्वर्या लवकरच ‘दिल है हिंदुस्थानी’ या रिअॅलिटी शोमधून टीव्ही जगतात पदार्पण करणार आहे.