दिग्दर्शक, निर्माता करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’चा टीजर प्रदर्शित झाल्यापासून अभिनेत्री ऐश्वर्या रय बच्चन ही भलतीच चर्चेत आलीय. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतरही तिची बरीच प्रशंसा केली जातेय. पण एक अशी व्यक्ती आहे जिने अद्याप ऐश्वर्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली नव्हती. अर्थातच, तुम्हाला ती व्यक्ती कळलीचं असेल. ऐश्वर्याचे नाव आले म्हणजे सलमानचे नावही आपणच येणार. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याच्या ब-याच दिवसांनंतर सलमानने चक्क ऐश्वर्याची प्रशंसा केली आहे. ऐश्वर्यांच्या सौंदर्याची प्रशंसा करत सलमान म्हणाला की, ती खूप सुंदर आहे.

एका वेब पोर्टलने दिलेल्या बातमीनुसार, ‘ऐ दिल है मुश्किल’च्या टीजरमध्ये ऐश्वर्याला पाहिल्यावर सलमान म्हणाला की, ती खूप सुंदर आहे. या वयातही ती किती सुंदर दिसतेय. कोणीही व्यक्ती तिच्या सहज प्रेमात पडेल. या चित्रपटात ऐश्वर्याने रणबीरसह काही बोल्ड सीनही दिले आहेत. यावरून सोशल मिडीयावरही बरीच चर्चा झाली. मात्र, सलमानने त्याबाबत काहीच म्हटले नाही.  ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटात रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्याव्यतिरीक्त फवाद खान आणि अनुष्का शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यानंतर रणबीर, अनुष्का आणि फवाद यांच्यामधील नात्याचा नेमका ठाव घेणे कठीण झाले होते. पण नंतर प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने काही प्रमाणात त्यांच्यातील नाते स्पष्ट केले. रणबीर आणि अनुष्का हे यात मित्रमैत्रिण दाखविण्यात आले आहेत. पण चित्रपटाचा ट्रेलर शेवटी आणखी एक प्रश्न सोडून जातो. अखेर, हे दोघं लग्नाच्या निर्णयापर्यंत कसे पोहचतात. तसेच, ऐश्वर्या आणि रणबीरमध्ये काही रोमॅण्टिक दृश्येही दाखविण्यात आली आहेत.
ट्रेलरमध्ये मैत्री, प्रेम, मस्ती आणि प्रेमभंग या सगळ्यांची झलक पाहावयास मिळते. ‘ऐ दिल है मुश्किल’चे शीर्षक गीत आणि ‘बुल्लेया’ ही दोन गाणी आत्तापर्यंत प्रदर्शित झाली असून  या दोन्ही गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच, रणबीर-ऐश्वर्यामधील केमिस्ट्री पाहता चित्रपटाबाबतची लोकांमधील उत्सुकता आणखीनच वाढली आहे. येत्या दिवाळीला म्हणजेच २८ ऑक्टोबरला ‘ऐ दिल है मुश्किल’ प्रदर्शित होईल. याच दिवशी अजय देवगणनेच दिग्दर्शन आणि अभिनय केलेला ‘शिवाय’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित होत आहे.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!

Teaser

A video posted by Aishwarya Rai Bachchan (@aishwaryaarai) on