सध्या बॉलिवूडमध्ये स्टार्सपेक्षा त्यांच्या मुलांबाबतच अधिक चर्चा होताना दिसते. कलाकारांसोबत त्यांची मुलं असली की प्रसारमाध्यमं त्यांच्या मुलांचेच फोटो काढण्यात जास्त मग्न असतात. शिवाय या स्टार किड्सचे चाहतेही भरपूर आहेत. सोशल मीडियावर या स्टार किड्सच्या फॉलोवर्सची संख्या पाहिली तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

येत्या दिवसांत एवढी कमाई करेल अक्षयचा ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’

स्टार किड्स कुठे जातात, काय करतात, इथपासून तर त्यांची फॅशन, स्टाइल आणि त्यांच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत अशा सगळ्यांचीच अलीकडे बातमी होते. अनेकदा आई- वडिलांप्रमाणे ही मुलंही करिअर म्हणून अभिनयाकडे वळताना दिसतात. सोनम कपूर, अर्जुन कपूर, वरुण धवन, अथिया शेट्टी, रणबीर कपूर, टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट, शाहिद कपूर, सोनाक्षी सिन्हा यांचंच पाहा ना… आपल्या आई- वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत हे स्टार किड बॉलिवूडमध्ये आले आणि त्यांनी त्यांचा जमही बसवला. पण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो त्याप्रमाणे याही गोष्टीला अपवाद आहेच.

स्टारकिड्सची आणखी एक नवी पिढी बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज आहे. यात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर, अमृता सिंग- सैफ अली खानची मुलगी सारा अली खान यांची नावं आघाडीवर आहेत. यापलीकडे आणखी काही स्टार किड्स बॉलिवूडमध्ये येणार म्हणून चर्चा आहे. यात शाहरूख खानची मुलगी सुहाना खान, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम, अक्षय कुमारचा मुलगा आरव आणि अजय देवगणची मुलगी न्यासा हेही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असे म्हटले जात आहे. पण या सगळ्यांमध्ये अजय आणि काजोलच्या मुलीने मात्र वेगळा मार्ग निवडलाय. तिला आई- बाबांसारखे अभिनयात काही स्वारस्य नाहीये. तिला जगप्रसिद्ध शेफ बनायचे आहे. हे आम्ही नाही तर खुद्द काजोलनेच सांगितले.

https://www.instagram.com/p/BXpiylrgo9k/

एका मुलाखतीत आपल्या मुलीबद्दल सांगताना काजोल म्हणाली की, ‘न्यासाला कुकिंगची प्रचंड आवड आहे. ती खूप मस्त ब्राऊनीज बनवते. घरी वेळ मिळतो, तेव्हा ती वेगवेगळे पदार्थ बनवत असते.’ काजोलने वयाच्या १६ वर्षा पासून सिनेमांत काम करणे सुरु केले होते. न्यासा सध्या १५ वर्षांची आहे. एकंदर काय तर, आईप्रमाणेच करिअरचा विचार तिच्याही मनात आता जवळपास पक्का झाला असेच म्हणावे लागेल.