अजय देवगण हे बॉलिवूडमधील मोठं नाव आहे. त्याच्यासोबत काम करण्यासाठी अनेक अभिनेत्री तयार असतात. पण बॉलिवूडमधील अशा तीन अभिनेत्री आहेत ज्यांनी अजयसोबत ‘बादशाहो’ सिनेमात काम करण्यास नकार दिला. पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात अजयची प्रेयसी आणि महाराणी साकारणाऱ्या व्यक्तीरेखेसाठी सुंदर अभिनेत्रीची गरज होती. त्यासाठी सुरूवातीला दिग्दर्शक मिलन लुथरिया ऐश्वर्या राय- बच्चनकडे गेले होते. पण ऐश्वर्याने मात्र कोणतेही कारण न देता या सिनेमाला नकार दिला. या सिनेमात इम्रान हाश्मी असल्यामुळे तिने नकार दिला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

‘फोर्ब्स’च्या यादीत आमिर ठरला ‘गरीब’

https://www.instagram.com/p/BXfpcnHAf7u/

करिना त्या दिवसांमध्ये गरोदर असल्यामुळे तिला या सिनेमात काम करता येणार नव्हते. त्यानंतर मिलन कतरिनाकडे ही व्यक्तीरेखा घेऊन गेले असता कतरिनाला तारखा जुळत नसल्यामुळे सिनेमाला नकार द्यावा लागला होता. करिना आणि कतरिना यांना सिनेमाची संहिता आवडली होती पण, तारखा जुळत नसल्यामुळे त्यांना या सिनेमाला नकार द्यावा लागला होता. अखेर इलियाना डिक्रुझने या सिनेमाला होकार दिला आणि ‘बादशाहो’च्या चित्रीकरणाला सुरूवात झाली.

दरम्यान, या सिनेमात अजय देवगण आणि इलियाना डिक्रूझ रोमान्स करताना दिसणार आहेत. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दोघांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळते. पण त्यांच्या या केमिस्ट्रीतील काही भागाला कात्री लागली आहे. सिनेमातील त्या दोघांच्या एका प्रणयदृश्याला कात्री लावण्यात आली आहे. या दृश्यामुळे सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकू शकतो अशी भिती दिग्दर्शकाला होती. म्हणून पुढे काही घडण्यापेक्षा त्यांनी आधीच ते दृश्य काढण्याचा निर्णय घेतला.