मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी आणि जागतिक स्तरावर मराठी चित्रपट पोहोचविण्याकरता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी महामंडळाने इंटरनॅशनल फिल्म मार्केट सेल व इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल  सबमिशन सेल, असे दोन विभाग सुरू केले आहेत.

आत्ताच्या डिजिटल युगात वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या टेरिटेरीजसाठी विविध प्रकारचे हक्क विकले जाऊ शकतात. या बाजारपेठेत निर्मात्यांना आपले माहितीपट, लघुपट, चित्रपट, म्युझिक आल्बम, अ‍ॅनिमेशन फिल्म आदींचे सॅटेलाइट,  डिजिटल टेरिटेरीज, डीव्हीडी एअरलाइन्स असे हक्क विविध देशांना विकता येतात.  चित्रपट कितीही जुना असला तरीही निर्मात्याला त्या चित्रपटांचे हक्क आंतरराष्ट्रीय पातळीवर विकता येऊ शकतो. या सर्व प्रक्रियेत निर्मात्यांना मदत करण्यासाठी महामंडळाने हे पाऊल उचलले आहे.

Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
mhada lottery pune , mhada pune marathi news
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
onion, farmers
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या केंद्र सरकारचा निर्णय
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?

येत्या ३ ते ६ एप्रिल या कालावधीत कान्स मीप टीव्ही या आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या बाजारपेठेत महामंडळ सहभागी होणार आहे. त्यासाठी चैत्राली डोंगरे यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. नीलकांती पाटेकर यांना ‘कान्स’ला पाठविण्यात येणार आहे.

चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने निर्मात्यांना मराठी चित्रपट विकता यावेत, म्हणून ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. कान्स मीप टीव्ही या चित्रपटांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चित्रपटांच्या हक्कांच्या विक्रीबाबत इच्छुक मराठी निर्मात्यांनी महामंडळाच्या मुंबईतील कार्यालयात नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी internationalffsubmission@gmail.com  या जीमेल वर किंवा  ०२२-२४३०८८७६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.