राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आता बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारनेही मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱयांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय जाहीर केला असून नेमक्या रकमेबद्दल अद्याप घोषणा झालेली नाही.

याआधी मुंबईकर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने दुष्काळग्रस्त शेतकऱयांच्या मदतीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केला होता. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे  दुष्काळग्रस्तांच्या भेटी घेऊन त्यांना आर्थिक मदत करीत आहेत. तर, काही दिवसांपूर्वी मनसेच्या चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी बॉलिवूडच्या कलाकारांना दुष्काळग्रस्तांना मदत न केल्यास चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा धमकीवजा इशारा दिला होता. आता अक्षय कुमारने दुष्काळग्रस्त शेतकऱयांच्या मदतीसाठी हात पुढे केल्यानंतर बॉलीवूडमधील इतर काही मंडळी देखील मदतीसाठी पुढे सरसावण्याची आशा आहे.