अक्षय कुमारचा आगामी सिनेमा ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या सिनेमाची कथा ही जनजागृती करणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानावरील विषयावर या सिनेमाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या सिनेमात अक्षय पहिल्यांदा भूमी पेडणेकरसोबत काम करताना दिसणार आहे. नुकेतच या सिनेमाचे चित्रिकरण संपले आहे. अक्षयने या सिनेमाशी निगडीत त्याच्या लग्नातला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने क्रीम कलरचा सूट घातला असून, लाल पगडी घातली आहे. तसेच पैशांची माळही गळ्यात घातली आहे. उत्तर भारतात ज्या पद्धतीने लग्न केले जाते तसाच काहीसा पोशाख अक्षयने या सिनेमातही परिधान केलेला पाहायला मिळतो. पण त्याच्या बाजूला ट्विंकल नसून भूमी आहे. त्यांचा हा फोटो खरंच खूप सुंदर आहे.

त्यांच्या या फोटोमुळे अक्षयच्या चाहत्यांना त्याच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाचे फोटो आठवल्याशिवाय राहणार नाही. या सिनेमात त्याचे लग्न हे सर्वसामान्य घरात ज्या पद्धतीने लग्न केले जाते तसेच केले असल्याचे दिसते. शिवाय अक्षय, ट्विंकलचे लग्नही आताच्या लग्नांसारखे एखाद्या सोहळ्याप्रमाणे नव्हते. दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले होते.

UPSC CSE Result 2023 12 attempts 7 mains UPSC aspirant's 'no-selection' post has a message of hope
“आयुष्याचे दुसरे नाव संघर्ष…”, UPSC परीक्षेत यश न मिळालेल्या उमेदवाराची पोस्ट तुफान व्हायरल, यशापेक्षा अपयशाची चर्चा जास्त
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?
loksatta analysis survey in britain predict uk pm rishi sunak s seat at risk
विश्लेषण: ब्रिटनमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांचे पद धोक्यात? ताज्या निवडणूक सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय?
95 percent ofh maayutis seat allotment problem was solved says girish mahajan
“महायुतीतील जागा वाटपाचा तिढा ९५ टक्के सुटला, पण…” गिरीश महाजन यांचे सूचक वक्तव्य

या दोन्ही लग्नांमध्ये फरक फक्त एवढाच आहे की, त्याच्या खऱ्या लग्नात त्याने मिश्या वाढवलेल्या नव्हत्या. अक्षय आणि ट्विंकलचा संसार हा दोन दशकांपेक्षाही जास्त आहे. दोघांना दोन मुलंही आहेत. तर ट्विंकल सध्या एक लेखिका म्हणून नाव कमावत आहे.

akshay-kumar-2

अक्षयचा ‘जॉली एलएलबी २’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. लवकरच अक्षयचा हा सिनेमा १०० कोटींची कमाई करेल अशी चिन्ह आहेत. टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमात अक्षय ‘केशव’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तर भूमी पेडणेकर ‘जया’ म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २ जूनला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ‘टॉयलेट एक प्रेम कथा’मधून भूमी पुन्हा एकदा नॉन- ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार आहे. यापूर्वी ती आयुषमान खूरानासोबत ‘दम लगा के हैशा’ या सिनेमात नॉन- ग्लॅमरस लूकमध्ये दिसली होती.

akshay-kumar-3

akshay-kumar-wedding

‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या सिनेमाशिवाय या वर्षी अक्षयचे अजूनही काही सिनेमे येणार आहेत. तसेच भूमी पुन्हा एकदा आयुषमानसोबत एकत्र सिनेमा करणार असून ‘शुभ मंगल सावधान’ असे या सिनेमाचे नाव आहे.