अभिनेता वरुण धवन आणि जॉन अब्राहम हे ढिशूम चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. या दोघांच्या टीममध्ये आता आणखी एका कलाकाराची भर पडली आहे. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार या चित्रपटात दिसणार असून त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
वरुण धवन, जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस आणि अक्षय खन्ना यांच्या ढिशूम चित्रपटात अक्षय कुमार पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय भूमिका साकारणार असल्याची बातमी गेल्याचवर्षी आली होती. त्यानंतर आता अक्षयच्या फर्स्ट लूकने चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी अधिक उत्सुकता वाढवली आहे. यात अक्षय त्याच्या खिलाडी अंदाजात जेट-स्कीवरून येताना दिसतो. विशेष म्हणजे अक्षयचा लूक यात बदलण्यात आलेला आहे. त्याला मॅन बन (केसांचा आंबाडा) लूक देण्यात आलेला आहे. या लूकमध्ये लिओनार्डो दीकॅप्रिओ बहुदा दिसतो. बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानही जेव्हा शूट करत नसतो तेव्हा या लूकमध्ये पाहावयास मिळतो. अक्षयने आपला हा लूक ट्विट केला असून म्हटले की, ढिशूममध्ये कॅमिओ काम करताना मला खूप आनंद झाला. साजिद, जॉन, वरूण, जॅकलीन माझ्या सर्व मित्रांना शुभेच्छा #Dishoom.