बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मिडीयावर शेअर केलेला एक फोटो बराच चर्चेत आला आहे. या फोटोत काळा ड्रेस परिधान केलेली आणि डोळ्यांवर गॉगल लावलेली अमिषा शॉवर घेताना दिसते. त्यास तिने ‘शॉवर लाइक अ टॉकस्टार’ असे कॅप्शनही दिले आहे. पण बहुदा तिला ‘शॉवर लाइक अ रॉकस्टार’ असे लिहायचे होते. सदर गल्लत लक्षात येताच अमिषाने आपली चूक सुधारली. दुस-या ट्विटमध्ये तिने लिहले की, टाइप करण्यात चुकी झाली, ‘टॉकस्टारट’ नाही ‘रॉकस्टार’. मात्र, तिची ही चुकी तिला चांगलीच महागात पडली. तिच्या या चुकीने नेटीझन्सना चर्चेचा विषय दिला.
अमिषाने केलेल्या चुकीच्या ट्विटवर नेटिझन्सनी खिल्ली उडवणा-या ट्विट्सचा वर्षाव केला. खरंतर अमिषाचा हा फोटो तिच्या चाहत्यांना आवडला आणि त्यांनी त्याची प्रशंसाही केली. अमिषाने केलेल्या चुकीचं म्हणाल तर चुका या माणसाकडूनच होत असतात. त्यामुळे अमिषाचे चाहते तिच्या या चुकीकडे दुर्लक्ष करतील अशी अपेक्षा करुया. अशा काही गोष्टींमुळे अमिषा चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी एकदा एका कार्यक्रमात अमिषाला ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाच्या सिक्वलबाबत विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणालेली की, या चित्रपटाचा सिक्वल यावा असे मलाही वाटते. पण माझ्यापेक्षाही प्रेक्षक याची जास्त आतुरतेने वाट पाहत आहेत. सोशल मिडीयावर हृतिक रोशनचे चाहते या चित्रपटाच्या सिक्वलची मागणी करत असतात. पुढे ती म्हणाली की, ‘मोहंजोदारो’च्या प्रमोशनवेळी पूजा हेगडेने ‘कहो ना प्यार है’ चे डबस्मॅश केलेले तुम्ही पाहिलेच असेल. ‘मोहंजोदारो’ हा चित्रपट चालला नाही याचे मला वाईट वाटले. पण सर्वच नवकलाकारांना पदार्पणातच एकसारखे यश मिळत नाही.