बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकताच त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवशी आपल्या कुटुंबाला वेळ देण्याला बिग बींनी प्राध्यान्य दिलं. चाहते आणि आप्तेष्टांपासून दूर बच्चन कुटुंबीय मालदीवला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन, नात आराध्या, मुलगी श्वेता नंदा आणि तिची मुलगी नव्या नंदा या सर्वांसोबत बिग बी वाढदिवसाच्या एक दिवस आधीच म्हणजेच १० ऑक्टोबर रोजी मालदीवला रवाना झाले होते.

या सेलिब्रेशनची अधिक माहिती कोणालाच नव्हती. आपल्या ब्लॉगमधून अमिताभ बच्चन स्वत: चाहत्यांशी सर्व गोष्टी शेअर करतात. मात्र यावेळी त्यांनी ब्लॉगमध्येही या सेलिबेशनचा उल्लेख केला नव्हता. या मालदीव व्हेकेशनबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता असतानाच सोशल मीडियावर त्याचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

VIDEO : विराट- आमिरचा भांगडा पाहिलात का?

यातील एका फोटोमध्ये आर्मी जॅकेटमध्ये बिग बी ऐश्वर्या, आराध्या, अभिषेक, नव्या आणि जयासोबत पाहायला मिळत आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्याने मिळून या मालदीव व्हेकेशनचं प्लॅनिंग केल्याचं म्हटलं जात होतं. गेल्या वर्षी अभिषेकचा वाढदिवससुद्धा मालदीवलाच साजरा करण्यात आला होता.

https://www.instagram.com/p/BaRQaywFD6y/

सध्या बिग बी ‘केबीसी’च्या नवव्या सिझनच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. ‘केबीसी’च्या टीमनेही त्यांच्यासाठी एक विशेष सरप्राईज प्लॅन केलं होतं. अमिताभ यांना भेट देण्यासाठी ‘केबीसी’ची टीम नैनीतालच्या ‘शेरवूड कॉलेज’मध्ये पोहोचली होती, जिथे बिग बींनी शिक्षण घेतलं होतं. तेथील काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.