वय… ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपसुकच चिंता पाहावयास मिळते. यामुळे आपण इतकं घाबरतो की, चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी करणाऱ्या किंवा वय लपवणाऱ्या जाहिरातींना बळी पडतो. थोडेसे पांढरे झालेले केसही आपण म्हातारे होत चाललोय की काय असा विचार करण्यास भाग पाडतात. कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर फिट राहणं ही त्यांची मुळातच गरज आहे. पण, काही कलाकार याही पलीकडे जाऊन आपलं आरोग्य सुदृढ राहावं म्हणून स्वतःची काळजी घेतात. वाढत्या वयातही तरुणांना लाजवतील अशी काही उदाहरणं बॉलिवूडमध्ये आहेत. त्यामुळे या अभिनेत्यांकडे पाहून वय हा निव्वळ त्यांच्यासाठी एक आकडा असल्याचे दिसून येते.

१. अनिल कपूर<br />‘मि. इंडिया’ ते ‘मेरा नाम है लखन’ म्हणून नाचणारा त्यावेळचा २४ वर्षीय अनिल आता खूप पुढे गेला आहे. त्याच्या छातीवर खूप सारे केस असल्यामुळे अनेकदा त्याची खिल्ली उडवण्यात आली असली तरी आज या अभिनेत्याकडे पाहून अनेक तरुण मंडळी तोंडात बोटं घालतात. काही दिवसांपूर्वीच या चिरतरुण अभिनेत्याने नव्या हेअरकटमधील फोटो शेअर केला होता. त्याचा फोटो पाहता ६० वर्षीय हा अभिनेता अजूनही २४ वर्षांचाच असल्याचे दिसून येते.

anil-kapoor

२. सुनील शेट्टी
काही दिवसांपूर्वीच सुनील शेट्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पिळदार शरीरयष्टी, दाढी आणि हटके हेअरकटमध्ये सुनीलचे वय कुठेतरी दडल्याचे दिसून येते.

suniel-shetty

३. जॅकी श्रॉफ
बॉलिवूडचा जग्गू दादा, किंग अंकल अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या जॅकी श्रॉफचे वय त्याच्या चेहऱ्यावरून दिसून येते. मात्र, जॅकी श्रॉफचे व्यक्तिमत्व आजही त्याचे वय विसरण्यास भाग पाडते. स्टाईलमध्ये या अभिनेत्याला कुणीच टक्कर देऊ शकत नाही.

jackie-shroff

४. मिलिंद सोमण
या अभिनेत्याबद्दल खरंच काही बोलण्याची गरज आहे का? ‘मेड इन इंडिया’ अल्बमपासून ते ‘आयर्न मॅन ऑफ इंडिया’ किताब पटकावणारा मिलिंद तरुणांसाठी आदर्शस्थानी आहे. आपल्या वयाला मागे टाकण्यासाठी जर एखादा पुरस्कार देण्यात आला तर निश्चितच तो मिलिंदला मिळेल यात शंका नाही.

milind-soman

५. अक्षय कुमार<br />६० फूट उंच इमारतीवरून अगदी सहज उडी मारणारा खिलाडी कुमार क्षणभरासाठी सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकवतो. त्यानंतर ३० वर्षे उलटूनही अगदी तितक्याच खुबीने अक्षय ती दृश्यं पूर्ण करतो.

akshay-kumar

६. राहुल खन्ना
राहुलने फार कमी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याने साकारलेल्या भूमिका लक्षात राहण्याजोग्या आहेत. ‘वेक अप सिड’मध्ये तो अखेरचा दिसला होता. त्याचे फोटो पाहता हा अभिनेता दिवसेंदिवस तरुण होत असल्याचे दिसते.

rahul-khanna

७. रजत कपूर
दिग्दर्शक आणि थिएटर अभिनेता रजत कपूर चित्रपटांची निवड अगदी चोखंदळपणे करतो. शेवटचा ‘कपूर अॅण्ड सन्स’मध्ये दिसलेल्या या अभिनेत्याने प्रभावीपणे आणि आकर्षक पद्धतीने वृद्धत्व स्वीकारल्याचे दिसून येते. तीनदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या रजतचे व्यक्तिमत्वच त्याच्याबद्दल सर्व काही बोलून जाते.

rahul-khanna

८. सैफ अली खान
‘ओले ओले’ गाण्यावर थिरकणाऱ्या सैफ अली खानने त्यावेळी आपल्या अदांनी बऱ्याच मुलींना घायाळ केले होते. चॉकलेट बॉय, प्रियकर आणि त्यानंतर खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सैफने वैयक्तिक आयुष्यातही स्वतःत बरेच बदल घडवून आणले. सैफची पडद्यामागची स्टाईल पाहून त्याचा नवाबीपणा स्पष्ट दिसून येतो.

saif-ali-khan

९. आमिर खान<br />बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण करण्यापूर्वीच ‘यादो की बारात’ चित्रपटातून आमिरने सर्वांची मनं जिंकली होती. आपल्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यात आमिर अग्रस्थानी आहे.

aamir-khan