बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षी घटस्फोटांच्या मालिकेत अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा तब्बल १८ वर्षांचा संसार मोडला होता. अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटाला अर्जून कपूर कारणीभूत असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. अरबाजपासून वेगळे झाल्यानंतर मलायका आणि अर्जून कपूर यांच्यात प्रेम फुलत असल्याच्या चर्चांना जोर आला होता. मात्र, या दोघांनीही मैत्री या शब्दाचा आधार घेत ते वृत्त फेटाळून लावले होते.

Virat-Gautham interaction video goes viral
KKR vs RCB : भाईचारा ऑन टॉप! विराट-गंभीर एकमेकांशी संवाद साधतानाचा नवीन VIDEO व्हायरल
If Unhappy Take Leave This Company Big Decision
“आनंदी नसाल तर कामावर येऊ नका”, ‘या’ कंपनीचा मोठा निर्णय; वर्षाला मिळणार ‘इतक्या’ दुःखी सुट्ट्या
Mayank reveals Ishant and Navdeep advised for IPL 2024
IPL 2024 : ‘वेगाशी तडजोड नाही…’, इशांत-नवदीपने मयंक यादवला दिला महत्त्वाचा सल्ला, वेगवान गोलंदाजाने केला खुलासा
Kitchen Tips In Marathi How To Identify Plastic Rice Kitchen Jugaad
Kitchen Jugaad: चालू गॅसवर एकदा तांदूळ नक्की टाका; टळेल मोठा धोका, VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
View this post on Instagram

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

मलायकासोबत काडीमोड घेतल्यानंतर अरबाज खान सध्या प्रेमात गुंतला आहे. नुकतेच त्याने ‘डिएनए’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये डेटिंग करत असल्याची कबुली दिली. मात्र त्याने कोणासोबत डेटिंग करतो यावर मौन बाळगले. डेटिंगवरील प्रश्नावर अरबाज म्हणाला की, ” मी सध्या डेटिंग करत आहे. आमच्यातील नाते किती दिवस चालेल याबद्दल सध्या काहीच सांगता येणार नाही.” त्याला ज्यावेळी इन्स्टाग्रामवरील फोटोतील तरुणीशी डेटिंग करतो आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने नक्की कोणती? असा प्रतिप्रश्न करत नाव सांगणे टाळले. अरबाज खानच्या इन्स्टाग्रामवर त्याने अनेक तरुणींसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील एखाद्या तरुणीशी तो डेटिंग करत असावा, अशी शंका नक्कीच फोटो पाहिल्यानंतर येते, पण वेगवेगळ्या तरुणींसोबतच्या फोटोमुळे अरबाज नक्की कोणासोबत डेटिंग करतोय, याचा अंदाज लावणे कठिण आहे. त्यामुळे तो कधी नाव सांगतोय, याचीच  प्रतिक्षा करावी लागेल.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी एकमेकांच्या सहमतीने वेगळा होण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांच्या घटस्फोटासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू होती. पुन्हा दोघे एकत्र येणार असल्याची चर्चा देखील रंगली होती. मात्र दोघांनी हे वृत्त फेटाळून लावत, आमच्यातील मैत्री कायम राहिल, असे म्हटले होते.