शाहरुखचे त्याच्या मुलांवर असलेले प्रेम हे सर्वज्ञात आहे. तो वेळोवेळी सोशल माध्यमांवरही आपल्या मुलांसमवेतचे फोटो आणि त्यांच्याविषयी काहीनाकाही तरी प्रसिद्ध करत असतो. पण आपले वडिल आपल्यात आणि छोट्या अबराममध्ये भेद करतात असे सुहाना आणि आर्यनचे मत आहे.
तू आर्यन-सुहानापेक्षा अबरामचे पालनपोषण काही वेगळ्या पद्धतीने करतोस का? असा प्रश्न एका मुलाखतीत शाहरुखला विचारला असता तो म्हणाला, मी आर्यन-सुहानाच्या वेळी जसे वागलो अगदी तसेच अबरामच्या बाबतीतही करतोय. पण मी अबरामसोबत जरा जास्तचं गोडीने वागतो असे त्या दोघांना वाटते. मग मीसुद्धा गप्प न बसता त्यांना उलट प्रश्न विचारतो, जेव्हा तुम्ही अबरामच्या वयाचे होतात तेव्हा मी तुमच्यावर प्रेम नाही केले हे तुम्ही कसे सांगू शकता? मी तुमच्याशीसुद्धा तितक्याचं प्रेमाने वागायचो. माझ्या मुलांसोबत मी कधीचं कठोर वडिलांप्रमाणे व्यवहार केला नाही. आणि हेच कारण आहे की अबराम माझ्यासोबत बहुतेकदा बाहेर येण पसंत करतो. पण माझी मोठी दोन्ही मुले लाजाळू आहेत. आर्यनला गाडीने प्रवास करणे फारसे आवडत नसल्यामुले तो फार कमी वेळा शूटींगच्या सेटवर माझ्यासोबत आला असेल. सुहानाचं म्हणाल तर माझ्या गाडीबाहेर लोकांची गर्दी पाहिल्यावर ती रडायलाचं लागायची. त्यावेळी फारशा काही सोयिस्कर सुविधाही नव्हत्या. त्यावेळी चांगली व्हॉनिटी नव्हती आणि स्टुडिओतसुद्धा खास सुविधा नसल्यामुळे त्या दोघांना सेटवर नेणं मी शक्यतो टाळत असे. अबरामला मैत्री करायला खूप आवडते. तो आपल्या भावंडांप्रमाणे लाजाळू नाहीए. तो गर्दीलाही घाबरत नाही आणि याच कारणांमुळे तो बहुतेकदा माझ्यासोबत शूटींगच्या सेटवर येतो. पण तो जेव्हा मोठा होईल आणि त्याला कळेल की आपले वडिल हे अभिनेता आहेत तेव्हा बहुदा आर्यन-सुहानाप्रमाणे तोदेखील माझ्यासोबत येणार नाही, या सुंदर शब्दात शाहरुखने आपले मत मांडले.